युवाशक्ती ही शिवसेनेची खरी ताकद -अनिल शिंदे
तर रामदास भोर यांची नगर तालुका उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती
नगर (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाला युवक मोठ्या संख्येने जोडले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, राज्यासह जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर पक्ष बांधणी सुरु असून, युवाशक्ती ही शिवसेनेची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले.
शिवसेनेच्या युवा सेना तालुका प्रमुखपदी योगेश दत्तात्रय धाडगे व नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांची नगर तालुका उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. धाडगे व भोर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख शिंदे बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, संदेश कार्ले, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, प्रतीक चौधरी, अमित दळवी, आशिष शिंदे, ओमकार शिंदे, प्रथमेश भापकर, शुभम कावळे, मंगेश दरवडे, विजय दळवी, दीपक झोडगे, सुशील कदम, ऋषिकेश गोंधळे, राजेश धाडगे, रवींद्र धाडगे, राहुल चिपाडे, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष भूषण भुजबळ, सोनू बिने, विशाल हराळे, अजय शिंदे, अशोक ताठे, विक्रम दळवी, अजय बारगजे, अक्षय धाडगे, जावेद शेख, बबलू पानमळकर, सोमा धाडगे आदींसह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप सातपुते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेकडे युवक आकर्षिले जात आहे. गाव तेथे शाखा अभियान राबविण्यात येणार आहे. नगर तालुका दौरा घेऊन गावोगावी युवा सेनेची शाखा हा संकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संदेश कार्ले यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे विचार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटचाल करत आहे. सर्वसामान्य वर्ग शिवसेनेशी जोडला गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शरद झोडगे म्हणाले की, गाव पातळीवर योगेश धाडगे यांनी उत्तमप्रकारे युवकांचे संघटन केले आहे. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याचे कार्य ते सातत्याने करत असून, पक्षाच्या माध्यमातून विविध प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब बोराटे यांनी युवकांनी समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे, त्यांना पक्षाच्या माध्यमातून पाठबळ दिले जाणार असल्याचे सांगितले.