• Wed. Feb 5th, 2025

आनंद योग केंद्रात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

ByMirror

Feb 4, 2025

मोठ्या संख्येने साधक सहभागी

नगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली. या उपक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


आरोग्य निरोगी व सदृढ राहून जीवन आनंदी होण्यासाठी आनंद योग केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना निशुल्क योग, प्राणायामाचे धडे दिले जातात. सर्वसामान्य नागरिकांमध्ये योग व प्राणायामाची आवड निर्माण होण्याच्या हेतूने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमात दीडशेपेक्षा जास्त योग साधकांनी सहभाग नोंदविला. उपस्थितांना निरोगी आरोग्यासाठी सूर्यनमस्काराचे फायदे सांगण्यात आले. सकाळी 10 वाजे पर्यंत योग साधकांचे सूर्यनमस्कार सुरु होते. आप आपल्या क्षमतेप्रमाणे साधकांनी 51, 101, 151 सूर्य नमस्कार पूर्ण केले. या उपक्रमासाठी योग केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *