भगवान गौतमबुद्ध जॉगिंग पार्कमध्ये नागरिकांची शोकसभा, व्यायाम सत्र स्थगित
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानंतर शहरातील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुक्रवारी (दि.2 मे) भगवान गौतमबुद्ध जॉगिंग पार्क येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी हरदिनचे सदस्य तसेच व्यायामासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सामूहिकरीत्या दुःख व्यक्त करत जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट केले.
या श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी व्यायाम सत्र स्थगित करून शांततेत शोक व्यक्त केला. याप्रसंगी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अहिल्यानगर कापड व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सचिनशेठ चोपडा, डॉ. नानासाहेब अकोलकर, उद्योजक संतोष लुणिया, विकास भिंगारदिवे, कांताबाई झंवर, सुनिता चव्हाण, प्रांजली सपकाळ, आराध्या परदेशी, संगीताताई भिंगारदिवे, सुवर्णाताई महागडे-भिंगारदिवे, रमेश वराडे, दीपकराव धाडगे, रतनशेठ मेहेत्रे, दिलीपराव ठोकळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, मनोहर दरवडे, सुधीरशेठ कपाले, सर्वेश सपकाळ, विलास आहेर, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, दिलीप गुगळे, दीपकराव घोडके, सरदारसिंग परदेशी, राजू कांबळे, अशोक पराते, अविनाश पोतदार, सुभाष पेंढुरकर, अनिलराव हळगावकर, शेषराव पालवे, सुभाष गोंधळे, प्रकाश देवळालीकर, कुमार धतुरे, संतोष हजारे, सूर्यकांत कटोरे, नामदेवराव जावळे, चुनीलाल झंवर, श्रीरंग देवकुळे, विकास निमसे, सूर्यकांत कटोरे, विजय महाजन, सचिन जाधव, रवी फल्ले, सुनील शिंदे, रावसाहेब हंचे, दशरथराव मुंडे, नवनाथ खराडे, तुषार घाडगे, बाळासाहेब झिंजे, बाळासाहेब गोंधळे, किरण गायकवाड, मारुतीराव खराडे, महेश सरोदे, सुहास देवराईकर, शशांक अंबावडे आदी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संजय सपकाळ म्हणाले की, अरुणकाका जगताप यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले. आपल्या कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे त्यांनी कार्य केले. त्यांच्या रुपाने जिल्ह्यातील कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. भिंगारच्या विकासासाठी देखील त्यांचे मोलाचे योगदान राहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सचिनशेठ चोपडा यांनी व्यापाऱ्यांना पोषक वातावरण निर्माण करुन देण्यासाठी व बाजारपेठेच्या विकासात्मक दृष्टीने अरुणकाका यांनी कार्य केले. त्यांच्या विकासात्मक व्हिजनने शहराच्या प्रगतीला गती मिळाली. सर्वसामान्यांची नाळ जुडलेले नेतृत्वाने सर्वांच्या मनात घर केले असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण शहरवासियांना दु:ख होत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. नानासाहेब अकोलकर, उद्योजक संतोष लुणिया आणि विकास भिंगारदिवे यांनी अरुणकाकांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अरुणकाका जगताप यांच्या निधनाने केवळ एक नेता हरपलेला नाही, तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती गेल्याचे दु:ख उपस्थितांनी व्यक्त केले.