उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान
नगर (प्रतिनिधी)- बहुद्देशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय आढावा बैठक नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडाच्या पावन ठिकाणी उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेच्या विविध राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पत्रकार संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला तसेच आगामी सामाजिक उपक्रमांची दिशा स्पष्ट केली.
या बैठकीचे विशेष आकर्षण ठरले ते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब जगताप यांनी त्यांचा सत्कार करुन अभिष्टचिंतन केले.
याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे, प्रदेश अध्यक्ष राजनंदिनी आहिरे, संघटक राजेंद्र भोसले, वैभवी गागरे, नाशिक जिल्हा संघटक अंजली लाळगे, प्रदेश कार्याध्यक्ष संजय वाल्हेकर, जिल्हा संघटक पिनू भोसले, राहुरी तालुका संघटक राजेंद्र भोसले, वैभवी गागरे यांसह अनेक पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नानासाहेब जगताप म्हणाले की, सप्तशृंगी मातेच्या साक्षीने एकत्र आलो आहोत, ही बाब अत्यंत आनंददायी आहे. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ केवळ पत्रकारांचे हक्क आणि अधिकार यासाठीच नव्हे, तर समाजातील दुर्लक्षित घटकांसाठीही कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या परिवर्तनासाठीही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रुपेश वराडे यांनी या सत्कार सोहळ्याने भारावलो असल्याची भावना व्यक्त करुन या सन्मानाने आनखी कार्य करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सांगितले.