गावात निघालेल्या दिंडी प्रदक्षिणेने वातावरण भक्तीमय
अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त गावातून दिंडी काढली. गावात निघालेल्या दिंडी प्रदक्षिणेने वातावरण भक्तीमय बनले होते. तर विठ्ठलाच्या भजनात विद्यार्थी, पालक तल्लीन झाले होते. जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोषाने गावाचा परिसर दणाणला.
गावात निघालेल्या बाल वारकऱ्यांच्या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी वेशभुषेत सहभागी झाले होते. वासुदेव, विणेकरी, टाळकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली व मुले विठ्ठल नामात दंग झाले होते. पर्यावरण संवर्धन, मुलगा-मुलगी एक समान आदी विविध सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी जागृती केली.

चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्यासाठी सरपंच युवराज कार्ले, उपसरपंच विश्वास गावखरे, माजी सरपंच ॲड. राजेंद्र गावखरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सागर वाळुंज, सुनील गोंडाळ, नवनाथ गोंडाळ, विश्वास चेडे, उत्तम कार्ले, बाळकृष्ण वाळुंज, गणपत काळे, रंगनाथ कार्ले, भाऊ जाधव, सुनील भोर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक रंगनाथ सुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक आशिष आचारी, आदम शेख, बाबासाहेब घुंगार्डे, विजय देवकर, कल्पना ठुबे, स्वाती अहिरे, आशंका मुळे, पुष्पवर्षा भिंगारे, प्रिया जाधव, महेश मुळे, अनिल पंडित, दादाराम हजारे यांनी परिश्रम घेतले.
