राजशिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी -ॲड. सुरेश लगड
नगर (प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या मुंबई भेटी दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली या यासंदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ॲड. सुरेश लगड यांनी केली आहे.
न्यायमुर्ती भूषण गवई हे महाराष्ट्रातील एकमेव न्यायमूर्ती असून, त्यांची एवढ्या मोठ्या उच्च पदावर सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणे ही बाब आपल्या सर्व महाराष्ट्रीयन यांना भूषणावह आहे. एवढ्या मोठ्या उच्च पदस्त न्यायमूर्तींबाबत राज शिष्टाचार पाळला जाऊ नये, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. राज शिष्टाचार न पाळणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी यांना दोषी धरून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ॲड. सुरेश लगड यांनी केली.
खरतर न्यायमूर्ती महोदय यांनीच घटनेच्या अनुछेद 142 अन्वये कारवाई करावयास पाहिजे. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या जाहीर नाराजी नंतर आता महाराष्ट्र शासनाने सरन्यायाधीश हे आता कायमस्वरूपी राज्य अतिथी असतील असा आदेश काढून आपली चुक दुरुस्त केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही ॲड. सुरेश लगड यांनी म्हटले आहे.