कामगारांनी नवे कौशल्य आत्मसात करावे -राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त आदर्श कामगारांचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- औद्योगिक क्षेत्राला सक्षम मनुष्यबळाची गरज असून, कामगारांनी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करावे. काळानुरुप पारंपारिक काम कालबाह्य होत असताना वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. हा बदल न स्विकारल्यास कामगारांना स्पर्धेतून बाजूला पडावे लागेल, यासाठी प्रवाहाबरोबर बदल स्वीकारण्याचे आवाहन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तर कामगार, उद्योजकांना सुरक्षा आणि दहशतमुक्तीसाठी एमआयडीसी अतिक्रमणमुक्त केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त नगर जिल्हा मजदूर सेना व स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात झालेल्या या मेळाव्याप्रसंगी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे, स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे, आकाश कातोरे, सुनिल कदम, जिल्हा मजदूर सेनेचे सचिव वसंत सिंग, महेश लोंढे, मयुर गायकवाड, विशाल शितोळे, अमोल हुंबे, विनायक देशमुख, अशोक दहिफळे, नरेश शेळके, शंकर शेळके, विवेक धाडगे, दिपक गिते, प्रवीण शिंदे, रामनाथ घुगे, रामदास कोरडे, विजय गावडे, राहुल मेहरखांब, चंद्रकांत मोरे, प्रशांत भोंग, सदाशिव रोहकले, सुहास ब्रम्हे, संतोष ढवळे, संजय गायकवाड, रविंद्र डहाळे, सोमनाथ पानमळकर, कचेश्वर सूर्यवंशी, विठ्ठल सागर, कुंडलिक आमले, राहुल चितळकर आदींसह कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे विखे पाटील म्हणाले की, कामगार विश्वात अस्थिरता आहे. असंघटित कामगारांचे भविष्य अंधकारमय असून, उद्योग क्षेत्रात काही गडबड झाल्यास पहिला बळी असंघटित कामगारांचा जातो. असंघटित कामगारांसाठी या संघटना त्यांचे हित जोपासण्याचे काम करत असून, कंपनीच्या हिताला देखील बाधा आणली जात नाही, हे देखील महत्त्वाचे आहे. मुंबई मधील गिरणी कामगारांच्या संपात अनेक कामगार उध्वस्त झाले. मुंबईतील हे लोन नगर जिल्ह्यात आले, तेंव्हा येथील कामगार चळवळीतील नेत्यांनी ती विध्वंसक प्रवृत्ती चिरडून टाकली.
नगर एमआयडीसीचा विस्तार थांबला होता, महसूल मंत्री असताना हजारो कोटी रुपये किमतीची 600 एकर जमीन एमआयडीसीच्या विस्तारासाठी उपलब्ध करून दिली. तसेच मोठ्या उद्योग समूहांशी चर्चा सुरू असून, त्यांचा औद्योगिक प्रकल्प नगरमध्ये आल्यास औद्योगिक व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. आपल्या जिल्ह्यातूनही अनेक उद्योजक भूमिपुत्र पुढे येत आहे. नवीन कामगार कायद्याप्रमाणे कामगारांचे जीवन सुलभ व शोषणमुक्त होण्यासाठी विविध संहिता निर्माण करण्यात आली असल्याचे त्यांनी माहिती दिली.
एमआयडीसीमध्ये खंडणीखोरांच्या टोळ्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर टपऱ्यांचे अतिक्रमण करुन गुंडांच्या टोळ्या पोसल्या जात आहे. या टपऱ्याचे अनाधिकृत अतिक्रमण तातडीने हटविण्याचे आदेश एमआयडीसीला दिलेले आहे. सुपा एमआयडीसी पूर्णतः साफ करण्यात आली असून, नगर एमआयडीसी देखील अतिक्रमण मुक्तीसाठी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. कामगार व उद्योजकांना सुरक्षा देण्यासाठी कठोरपणे हा निर्णय राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार करून व दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकात बाबूशेठ टायरवाले म्हणाले की, शेतकरी कामगारांमुळे देशाची अर्थव्यवस्था चालत आहे. मात्र दोन्ही वर्गाकडे सरकारचे लक्ष नाही. नगर एमआयडीसीमध्ये एकही कारखाना युनियमुळे बंद पडला नाही. वेळोवेळी पगार मिळाला नाही, तरी कामगारांनी बंद पुकारला नाही. कंपनीला सहकार्य करण्याचे काम केले. कामगारांच्या हक्कासाठी कायदेशीर मार्गाने वेळप्रसंगी ताकतीने देखील लढण्यास तयारी आहे. सुपा एमआयडीसी येथे पुढाऱ्यांची दादागिरी व दहशतीने हप्ता वसुली सुरू आहे. उद्योजकांनी तक्रार केल्यास पूर्ण संरक्षण त्यांना संघटनेच्या माध्यमातून दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाहुण्यांचे स्वागत करुन योगेश गलांडे म्हणाले की, कामगारांच्या मागे कुणी उभा राहत नाही. त्यांचे प्रश्न बिकट बनत चालले आहे. असुरक्षित कामगारांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना संरक्षण देण्याचे काम दोन्ही संघटना करत आहे. कामगारांचे हात बळकट करण्याचा उद्देश ठेवून कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. यावेळी पवार मॅडम, शुभम पुंड, स्वप्नील खराडे, संतोष शेवाळे, अजिनाथ शिरसाट, प्रदिप दहातोंडे, दिपक परभणे, वसिम शेख, नामदेव झेंडे, शशीकांत संसारे, जितेंद्र तळेकर, सोमनाथ बारबोले, सोमनाथ शिंदे, सचिन खेसे, सागर बोरुडे, राहुल जगधने, सचिन कांडेकर, सागर ठाणगे, पोपट जगताप, संजय शिंदे, अमोल ठोकळ, अवी कर्डिले, सोमनाथ आंधळे, निलेश शेवाळे, तुषार शेवाळे, भरत दिंडे, कृष्णा लाडगे, शाम कर्डिले, अशोक भगत, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
आदर्श कामगारांचा सन्मान
पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते आदर्श कामगार म्हणून प्रविण शिंदे, रामनाथ घुगे, प्रशांत भोग, सदाशिव रोहोकले, सोमनाथ पानमळकर, रामदास कोरडे, विजय गावडे, सुहास ब्रम्हे, संतोष ढवळे, कचेश्वर सुर्यवंशी, राहुल मेहरखांब, चंद्रकांत मोरे, संजय गायकवाड, रविंद्र डहाळे, कुंडलिक आमले, राहुल चितळकर, महेश काळे, विद्या पवार या कामगारांचा गौरव करण्यात आला.