अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील फरहा शेख या मुलीने अवघ्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. अत्यंत कमी वया मध्ये रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.
पहाटे तिने सहेरी करुन भक्तीभावाने नमाज अदा केली आणि संध्याकाळी रोजा इफ्तारीने सोडला. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ तिने निर्जली रोजा ठेवला होता. फरहा शेख ही हाजी जाफर शेख यांची नवासी आहे. ती सन शार्इन स्कूलमध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे. फरहा हिने ठेवलेल्या रोजाबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन केले.
