मार्केटयार्ड चौकातील पुतळ्यास मानवंदना
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेनेतर्फे मार्केटयार्ड येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या मानवतावादी योगदानाच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, माजी नगरसेवक संभाजी कदम, संजय शेंडगे, गणेश कवडे, सचिन शिंदे, संतोष ग्यानप्पा, दत्ता जाधव आदींसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा प्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचे जनक आहेत. त्यांनी समाजातील शोषित, वंचित, मागास घटकांना संविधानाच्या माध्यमातून न्याय, समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग दिला. बाबासाहेबांनी दिलेले मूल्य आजही समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. त्यांना फक्त अभिवादन करून चालणार नाही, तर समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचारांमुळेच आज भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांपैकी एक म्हणून उभा आहे. त्यांनी संविधानातून सर्वसामान्य नागरिकांना हक्क, स्वातंत्र्य आणि संरक्षण दिले. महिला, कामगार, शेतकरी, वंचित समाज प्रत्येकाच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिवसेना नेहमीच समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत राहिली आहे. बाबासाहेबांनी दाखवलेल्या ज्ञान, शिक्षण आणि संगठनाच्या मार्गावरच पुढे
