• Sat. Jan 10th, 2026

भिंगार शहरात शाकंभरी नवरात्र व पौष पौर्णिमा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार

ByMirror

Jan 10, 2026

देवांग कोष्टी समाज बांधव व महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद


समाजाला एकत्र आणणारा उत्सव -शिवम भंडारी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातील देवांग कोष्टी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शाकंभरी नवरात्र व पौष पौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिमय, धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजाच्या धार्मिक परंपरा व सांस्कृतिक वारसा जपणारा या सोहळ्यात समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


या उत्सवानिमित्त भिंगार शहरातून लेझीम, टाळमृदंगाच्या गजरात बाल वारकरी मुलांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या तालावर गजरत निघालेल्या वारकरी मुलांनी उपस्थितांचे मन जिंकले. या मिरवणुकीत समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला भजनी मंडळाच्या वतीने श्री गणेशाच्या भक्तिगीताने मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. टाळच्या गजरात सादर होणाऱ्या भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग व भक्तीभावाने केलेले भजन हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.


या संपूर्ण कार्यक्रमात समाजातील इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्यासाठी युवा नेते अक्षय कर्डिले, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ, महेश झोडगे तसेच मित्र परिवाराने उपस्थित राहून समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी भिंगारचे अध्यक्ष शिवम प्रभाकर भंडारी, महिला अध्यक्षा राखी उपरे, विठ्ठलराव लोखंडे, अनिल सोळशे, विजयकुमार भंडारी, संदीप टेके, ज्ञानेश्‍वर फासे, रमेश बोंदर्डे, उमाकांत आस्मर, गणेश उपरे, किशोर उपरे, दत्ता लोखंडे, गजानन भंडारे, बाळकृष्ण कुमठेकर, नारायण वाघुंबरे, माऊली दिघे, राहुल लिपारे, आशुतोष गलांडे, स्वप्निल कांबळे, दीपक बोंदर्डे, पवन बोंदर्डे, देविदास कुमठेकर, राजू कुरकुटे, प्रवीण खरपे, हर्षद लोखंडे, भाऊ चिनके, दीपक चिनके, जय लोखंडे, बाळू हंपे, सुनील विधाटे, शुभम चिनके, अनिल दिवटे, श्‍याम दिवटे, अनिल गलांडे, वैभव लिपारे, अलका भंडारी, राजश्री दिवटे, राणी लोखंडे, शितल कांबळे, संगीता गलांडे, रूपाली बाबर, गीता बाबर, भाग्यश्री लोखंडे, अनिता लोखंडे, ज्योती उदबत्ते, अमोल उदबत्ते, ओंकार उदबत्ते, आदित्य दिवटे, योगेश उपरे, रसिका लोखंडे, अनिता सोळसे आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.


शिवम भंडारी म्हणाले की, “देवांग कोष्टी समाज हा नेहमीच परंपरा, संस्कृती आणि भक्तीभाव जपणारा समाज आहे. शाकंभरी नवरात्र व पौष पौर्णिमा हे उत्सव केवळ धार्मिक नसून समाजाला एकत्र आणणारे आहेत. आजच्या या मिरवणुकीतून आपली संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बाल वारकरी, महिला भजनी मंडळ, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मनाला समाधान मिळते. समाज एकसंघ राहिला तरच आपण पुढे जाऊ शकतो. धार्मिक उत्सवांसोबत सामाजिक उपक्रम, शिक्षण, आरोग्य आणि युवकांच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *