नागरिकांचे अधिकार व मुल्य जोपासण्याचे काम सातत्याने सुरु -संदीप कापडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संदीप (नाना) महादेव कापडे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रविराज साबळे यांनी कापडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
संदीप कापडे यांनी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना संघटनेचे उत्तमपणे कार्य करून सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेच्या माध्यमातून राज्यात काम करण्याची संधी देण्यात आली असल्याचे मत साबळे यांनी व्यक्त केले.
संदीप कापडे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या माध्यमातून नागरिकांचे अधिकार व मुल्य जोपासण्याचे काम सातत्याने सुरु आहे. वंचितांच्या हक्कासाठी हा संघर्ष असून, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. दीन-दुबळ्यांना आधार देण्याचे काम सुरु असून, समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल त्यांचे राज्य महिला उपाध्यक्षा अनघा साळवी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विकास दंडवते, अहमदनगर जिल्हाध्यक्ष शरद महापुरे, कार्याध्यक्ष अनिल गायकवाड, उपाध्यक्ष दीपक गायकवाड, अशोक टाके, संतोष वाघ, सविता हराळ, स्वाती दातीर, विलास मकासारे, उत्तम गरगडे, कैलास जगताप, नितीन देवकर, सुशील डांगे, नानासाहेब बांगर, विजय गायकवाड, गोरक्षनाथ शिंदे ,परशुराम गारुळे, विक्टर वाघमारे, राजेंद्र शिंदे आदी मानव अधिकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
