स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान, (घर घर लंगर सेवा) अहिल्यानगर तर्फे श्री गुरु तेग बहादूरजींच्या 350 व्या शहिदी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनातील कार्य व त्यांनी दिलेला संदेश समाजा पर्यंत घेऊन जाण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेमुळे गुरु तेग बहादूरजींच्या अमर त्यागाचा, धार्मिक स्वातंत्र्याचा आणि मानवतेच्या संदेशाचा प्रभावी प्रसार करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी श्री गुरु तेग बहादूरजी यांनी धर्मासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि विविधतेतील एकता, गुरु तेग बहादूरजी यांचे जीवन हे विषय देण्यात आले होते.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सुवर्णा दीपक पवार (अहिल्यानगर), द्वितीय- अक्षरा किशोर महाजन (वसमत, जि. हिंगोली), दुर्गेश किशोर चिलवर (जालना), तृतीय- अजितकौर बलजीतसिंग वधवा (अहिल्यानगर) आणि उत्तेजनार्थ- स्नेहल छाजेड (अहिल्यानगर) तसेच पूणे, श्रीरामपूर व नागपूर येथील सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ म्हणून घोषित करण्यात आले आहे. पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे 2501/-, 1501 आणि 501 रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहेत.
गुरु तेग बहादूरजींच्या 350 व्या शहिदी शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी जनक आहुजा, गुलशन कंत्रोड, प्रितपालसिंग धुप्पड, मुन्नासेठ जग्गी, सतीश गंभीर, हरजीतसिंग वधवा यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कंत्रोड, प्रशांत मुनोत, राजू जग्गी, सुनील थोरात, सोमनाथ चिंतामणी, राजा नरंग, कैलाश नावलानी, सनी वाधवा, सिमरजीतसिंग वाधवा, मनोज मदन, प्रमोद पंटम, शरद बेरड, राहुल बजाज, जय रंगलानी, राजेश कुकरेजा, दामोदर माखिजा, सुनील मेहतानी, कैलाश लालवाणी, किशोर मुनोत, अर्जुन मदन, अभिमन्यु नय्यर, जतिन आहुजा, किशोर रंगलानी, दलजीतसिंग वधवा यांनी परिश्रम घेतले.
