महाराष्ट्राच्या व्यापारी शिखर संस्थेवर निवड
नगर (प्रतिनिधी)- दि अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे सभासद रमेश पुखराज सोनीमंडलेचा यांची फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम) च्या सेक्रेटरीपदी नियुक्ती झाली.
महाराष्ट्राची व्यापारी शिखर संस्था असलेल्या या संघटनेच्या सेक्रेटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष विनेश मेहेता, राजेश शहा, खजिनदार नरसिंग जैन, मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष गोपाळ मणियार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी राजेंद्र बोथरा आदी उपस्थित होते.
सोनीमंडलेचा यांनी मर्चंट असोसिएशनचे सल्लागार, उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी पद भूषवले आहे. त्यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्याबद्दल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोकलाल गांधी, उपाध्यक्ष पेमराज पितळे, संतोष बोरा, विश्वनाथ कासट, दीपक बोथरा यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.