महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम; नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी (दि.10 एप्रिल) मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गरजूंना सहभागी होण्याचे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.
नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर होणार आहे. यामध्ये गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून ज्या रुग्णांना मोतीबिंदू, काचबिंदूची गरज आहे, अशा रुग्णांना पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटल मध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच रुग्णांना पुणे येथे जाणे, येणे, राहणे व जेवण्याची मोफत सुविधा केली जाणार आहे. तरी गरजू रुग्णांनी शिबिरात सहभागी होण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9881810333 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.