सुहास देशपांडे, प्रा. सुभाष चिंधे कार्याध्यक्षपदी नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेची नगर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसाठी ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांची बैठक झाली. त्यात कार्यकारणी निश्चित करण्यात आली.
प्रारंभी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष म्हणून भागा वरखडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सुहास देशपांडे, प्रा. सुभाष चिंधे यांची कार्याध्यक्ष म्हणून, तर विकास अंत्रे, सचिन धर्मापुरीकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा करुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
व्हॉईस ऑफ मीडिया कार्यकारणीच्या सरचिटणीसपदी चंद्रकांत शिंदे, सहसचिवपदी मुरलीधर तांबडे, संघटकपदी राजेंद्र त्रिमुखे, कोषाध्यक्षपदी दौलत झावरे, प्रवक्तेपदी प्रदीप पेंढारे, प्रसिद्धी प्रमुखपदी बालकुणाल अहिरे, कार्यकारिणी सदस्यपदी अतुल लहारे, संतोष आवारे, तेजस शेलार, बिलाल पठाण, वाजिद शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
