अल्पसंख्यांक शाळेतील विविध प्रश्न सोडविण्याचा संकल्प
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्यूनियर कॉलेजचे मुनव्वर हुसैन छोटे खान यांची स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या जिल्हा अल्पसंख्यांक सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. शिक्षक, शिक्षकेतरांच्या विविध प्रश्नांवर कार्य करणाऱ्या या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खान यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
स्वाभिमानी शिक्षक संघटना मुख्याध्यापक सेलचे जिल्हाप्रमुख अमोल क्षीरसागर म्हणाले की, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कार्य करणाऱ्या या संघटनेत मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग जोडले जात आहे. संघटनेच्या माध्यमातून सर्वांना सामावून घेतले जाणार असून, सर्वांनी संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुनव्वर खान यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन अल्पसंख्यांक शाळेतील विविध प्रश्न व त्याचप्रमाणे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटनेचे संस्थापक के.पी. पाटील यांनी खान यांना नियुक्तीबद्दल पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गवते, जिल्हा सरचिटणीस सुनील अंगारखे, उपाध्यक्ष उमेश भोईटे, संघटन प्रमुख किरण डहाणे, राहुल मोरे, गणेश शिंदे, संगमनेर तालुका अध्यक्ष किशोर कार्ले, नगर तालुकाध्यक्ष भारत गोल्हार, उपाध्यक्ष विजय साळवे, महिला आघाडी उपाध्यक्षा रिबीका क्षेत्रे आदी उपस्थित होते.