नगर (प्रतिनिधी)- विवाहितेचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ केल्याप्रकरणी अग्निशमन विभागातील अधिकारी भरत शंकर मिसाळ यांच्यासह त्यांचे कुटुंबीय विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पती आणि सासऱ्याचे मंडळीकडून सातत्याने मारहाण शिवीगाळ पैशाची मागणी आणि जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी भरत शंकर मिसाळ (पती), शंकर उत्तम मिसाळ (सासरे), कमल शंकर मिसाळ (सासू) आणि धनश्री शंकर मिसाळ (ननंद) सर्व राहणार म्युन्सिपल कॉलनी, नालेगाव अहिल्यानगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि भरत मिसाळ यांचा प्रेमविवाह 2018 साली झाला होता. मात्र विवाहानंतर लगेचच मानसिक छळाला सुरुवात झाली. सासरच्या मंडळींनी तब्बल 5 लाख 50 हजार रुपयाची मागणी करत वारंवार माहेर कडून पैसे आणण्याचा तगादा लावला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मे 2024 ते जून 2025 या कालावधीत मुंबईत राहत असताना पती भरत मिसाळ यांनी पीडितेला वारंवार मारहाण केली. दारूच्या नशेत असताना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या सर्व प्रकारांनी मानसिक आणि शारीरिक त्रास झाल्याने पीडित विवाहितेने अखेर पोलिसांची मदत घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहे.