• Thu. Oct 16th, 2025

सामाजिक कार्यकर्त्या अनिता काळे मानवाधिकार समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

ByMirror

Aug 29, 2023

काळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना मुंबई येथील प्रियदर्शनी फाउंडेशनच्या वतीने मानवाधिकार समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अनिता काळे


मुंबई सेंट्रल (पश्‍चिम) येथे झालेल्या प्रियदर्शनी फाउंडेशनच्या कार्यक्रमात काळे यांना बाल हक्क संरक्षण आयोग व महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशिबेन शहा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी सिने अभिनेत्री शीतल माने, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर म्हात्रे, उद्योजिका संगीता गुरव, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती ओक, संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे, शिवशंभू संघटनेचे विजय भोसले, प्रियदर्शनी फाउंडेशनचे अध्यक्ष छाया आमरुले, सामाजिक कार्यकर्ते सुरज भोईर आदी उपस्थित होते.


अनिता काळे या भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. जिजाऊ ब्रिगेडच्या विविध पदांवर त्यांनी काम केले असून, सध्या त्या हिरकणी ग्रुपच्या अध्यक्ष व मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहे. राजमाता जिजाऊंच्या विचाराने भावी पिढी घडविण्याचे कार्य त्या करत आहे. जिल्हा परिषदेतील शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्याची सुरु केलेली मोहिम व महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना मानवाधिकार समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *