हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांसह व्यायामाला आलेल्या नागरिकांशी साधला संवाद
उद्यानातील विविध प्रश्न सोडविल्याबद्दल सत्कार
नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी वेळ काढून रविवारी पहाटे भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या हास्य योगात सहभाग नोंदवला. योगा-प्राणायामानंतर जगताप हास्य योगात रमले होते. उद्यानातील विविध प्रश्न सोडविल्याबद्दल आ. जगताप यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करुन त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आ. जगताप यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांसह उद्यानात व्यायामासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सीए रविंद्र कटारिया, जहीर सय्यद, उद्योजक लॉरेन्स स्वामी, सचिन चोपडा, रमेशराव वराडे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, सुमेशराव केदारे, अभिजीत सपकाळ, रतन मेहेत्रे, दिलीप गुगळे, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, अशोक पराते, संजय भिंगारदिवे, सुधीर कपाळे, विकास भिंगारदिवे, दीपक बडदे, सुभाष पेंढुरकर, प्रकाश देवळालीकर, जैद सय्यद, विठ्ठल राहिंज, राजश्री राहिंज, सुरेखाताई आमले, राजू कांबळे, निर्मलाताई पांढरे, शाहीन सय्यद, हिंगणेताई, जावळेताई, मुन्ना वागस्कर, जियान सय्यद, चुनीलाल झंवर, अविनाश जाधव, शशांक अंबावडे, अनिल सोळसे, सरदारसिंग परदेशी, विलास आहेर, संपतराव बेरड आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप म्हणाले की, शहराचे सामाजिक व पर्यावरणाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य योगदान देत आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमातून गरजू घटकांना आधार देण्याचे काम करत आहे. शहर व उपनगरांचा विकास साधला जात असताना मोठ्या प्रमाणात शहर चारही दिशेने विस्तारले जात आहे. शहराच्या सर्वांगीन विकासासाठी नियोजनात्मक कार्य सुरु आहे. जनतेने दिलेल्या संधीच्या माध्यमातून हे विकास उभे राहिले आहे. या विकासाला गती देण्यासाठी पुन्हा संधी देण्याचे आवाहन जगताप यांनी केले. तर शहर विकासाला गती देणारी ही निवडणुक ठरणार आहे. विकासात्मक शहराचे स्वप्न साकारण्यासाठी व विकास कामे पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, शहर विकासाचे व्हिजन असलेल्या उमेदवाराच्या पाठीशी सर्व नागरिक एकवटले आहेत. हरदिन मॉर्निंग ग्रुपची देखील विकासाला साथ राहणार आहे. आ. संग्राम जगताप यांनी शहराचा विकास साधत असताना खेळ, क्रीडा मैदान यांना चालना देऊन येणाऱ्या पिढीचे आरोग्य जपण्याचे काम केले. तर ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी रुग्णालयाची देखील उत्तमप्रकारे सोय व फिरण्यासाठी उद्यानांची सोय केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी अनंत सदलापूरकर, संतोष हजारे, दिनेश शहापूरकर, राजू शेख, कुमार धतुरे, संतोष लुणिया, रमेश कोठारी, हरीश साळुंखे सुरेंद्रसिंह सोहेल, नागेश खुरपे, महेश गोंडाळ, प्रशांत भिंगारदिवे, अजय आठवले, शेषराव पालवे, नामदेव जावळे, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, मारुती पवार, सखाराम अळकुटे, नवनाथ खराडे, अमित खामकर, शिरीष पोटे, भाऊसाहेब भांड, सुनील कसबे, सिद्धेश्वर पारेकर, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, सुनील बग्गन, संदीप शिंगवी, सागर काबरा, चेतन वझगडेकर, अजेश पुरी, भरत कनोजिया, सचिन थोरात, किरण फुलारी, भाऊसाहेब झांबरे, राजेंद्र पांढरे, सदाशिव नागापुरे, शंकर भैरट, सुभाष त्रिमुखे, बाबासाहेब नागपुरे, मच्छिंद्र जाधव, शिवकुमार पांचारिया, नंदलाल परदेशी, शिवांश शिंदे, नितीन भिंगारकर, संदीप छजलानी, एकनाथ भिंगारदिवे, दीपक अमृत, विशाल भामरे, सुदाम गांधले, राहुल मोहीरे, सिद्धूतात्या बेरड, धीरज नागपुरे, सचिन कस्तुरे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.