“प्रश्नमंजुषा, गायन आणि व्याख्यानातून होणार समाजजागृती; नागरिकांना मोठ्या सहभागाचे आवाहन
महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी परिसरात महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी (दि. 14 एप्रिल) हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा जयंती सोहळा आम्रपाली मंगल कार्यालय, गुलमोहर रोड, सावेडी येथे संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात पूजन व वंदना करून होईल. त्यानंतर विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, नवोदित कलाकारांसाठी गायन सादरीकरण, तसेच समाजप्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांद्वारे महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी पाटबंधारे मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र आंधळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, ते समाजप्रबोधन आणि तरुणाईच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा. निवृत्ती आरु, संपर्क प्रमुख सुधाकर जाधव, स्वागताध्यक्ष एन. एम. पवळे, तसेच सचिव सी. पी. क्षेत्रे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांनी नागरिक, विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.
हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष पी. पी. खंडागळे, शिरीष जाधव, सहसचिव बी. आर. सातपुते, गिरीष गायकवाड, भिमराव घोडके, राजेंद्र थोरात, डॉ. प्रताप घोडके, इंजि. निखिल आरु, डॉ. अमित पवळे, इंजि. किरण पगारे, अजय साळवे, ॲड. सुबोध जावधे, सतीष राजगुरु, अविनाश भोसले, मनेष कांबळे, अजित घोडेस्वार, डॉ. तुरुकमाने, डॉ. बी. एन. रणनवरे, के. के. जाधव, मार्शल भिंगारदिवे, मनोहर पाटोळे, संजय शिंदे, डॉ. शैलेश खंडागळे, रमेश जगताप, अर्जुन कांबळे, राजु थोरात, विजय पाटोळे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
