तब्बल 46 विद्यार्थी जिल्हा व केंद्र स्तरावरील गुणवत्ता यादीत चमकले
शाळेत गुणवंतांचा गौरव सोहळा
vvvvvvअहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने स्टुडन्ट टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली. शाळेतील तब्बल 32 विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादीत, तर 14 विद्यार्थी केंद्र गुणवत्ता यादीत चमकले असून, एकूण 46 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सविभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, प्राचार्या छाया काकडे, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, तसेच पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तर विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शितल रोहकले, जयश्री खांदोडे, सोनाली अनुभुले, रूपाली वाबळे, भाग्यश्री लोंढे, भारती सुसरे, इंदुमती दरेकर, कांचन मदने, पुनम धाडगे, रूपाली पांडुळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची कामगिरी
इयत्ता पहिली – ओजस्वी भोरे व संस्कृती वायकर (जिल्ह्यात दुसरी), अपूर्व बडवे, शौर्य कांडेकर, चिरायू जाधव (जिल्ह्यात चौथा), अनन्या देवकर, आर्वी चौरे, जेसिएल कसोटे, वेद खराडे (जिल्ह्यात पाचवा), समृद्धी राजळे, अनिश गोरे, शौर्य पठारे, अन्वित इंगुले (जिल्ह्यात सहावा), शुभ्रा साळुंके (जिल्ह्यात सातवी).
इयत्ता दुसरी- स्वरव अनभुले, कैवल्य गारुडकर (जिल्ह्यात चौथा), कोहक सान्वी, अद्विका गाडीलकर (जिल्ह्यात पाचवी), रुद्र हिंगे, सिध्दी पवार, ज्ञानश्री नवले (जिल्ह्यात सहावी), सान्वी पवार, स्वराज लांडगे, आयुष गंभीरे (जिल्ह्यात सातवा).
इयत्ता तिसरी- रुद्र गुंजाळ (जिल्ह्यात दुसरा), श्रीराज गुंजाळ (जिल्ह्यात चौथा), आराध्या जाधव (जिल्ह्यात पाचवी), गायत्री कडूस (जिल्ह्यात चौदावी), शांभवी हंबर्डे (जिल्ह्यात पंधरावा), वेदांत अंधारे (जिल्ह्यात सतरावा).
इयत्ता चौथी- राजनंदिनी गांगर्डे (जिल्ह्यात पंधरावी), स्वरा दरेकर (जिल्ह्यात सतरावी).
केंद्रस्तर गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
इयत्ता पहिली- ईश्वरी साबळे, नेहूल दारकुंडे, शिवराज जगताप (प्रथम), श्रेयस पाटेकर (द्वितीय).
इयत्ता दुसरी- काव्या शेंडे, रुद्रांश फलके, राजदीप पिंपळे (प्रथम), सान्वी ठाणगे, सान्वी राशीनकर, समर्थ वायभासे (द्वितीय).
इयत्ता तिसरी- श्रृती फसले (प्रथम), युवराज भोर (द्वितीय).
इयत्ता चौथी- शिवम दरेकर, विराज काटमोरे (प्रथम).
