• Thu. Mar 26th, 2026

अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे यश

ByMirror

Mar 26, 2026

सरफराज शेख जिल्ह्यात प्रथम; 33 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत


गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाने यंदा अभूतपूर्व यश संपादन करत एकूण 33 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पुन्हा शाळेने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
या परीक्षेत सरफराज शाकीर शेख याने 300 पैकी 286 गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अनुष्का विलास धामणे व पार्थ विक्रम जाधव (276 गुण) यांनी तिसरा क्रमांक, सर्वेश प्रवीण आव्हाड (274 गुण) चौथा क्रमांक, आदित्य अशोक औटी (270 गुण) सहावा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.


याशिवाय राजनंदनी राहुल गांगर्डे, आस्था निलेश सुंबे, सिद्धवेदाय सचिन पेंडभाजे, वेदांत वैभव राहिंज (प्रत्येकी 268 गुण) यांनी सातवा क्रमांक, स्वरा सचिन दरेकर (266 गुण) आठवा क्रमांक, तर आरोही विजय सोनवणे (264 गुण) नववा क्रमांक पटकावला.


तसेच अनुराज संतोषकुमार दराडे व सत्यजित विठ्ठल शिंदे (262 गुण) यांनी दहावा क्रमांक, संस्कृती बाबासाहेब कापरे व प्रणव प्रदीप उकांडे (260 गुण) यांनी अकरावा क्रमांक मिळवला. यासह विराज शिशिर काठमोरे, आर्यन गोरख शेरकर, अधिराज संतोषकुमार दराडे, आरोही अनिल गोसावी, आरोही दिनेश सुंबे, मृणाली भावका उंबरे, गौरी बंडू कोतकर, शिवम सुनील दरेकर, अनुज भाऊसाहेब पवार, स्वरा प्रवीण सुंबे, आरिज जावेद शेख, काव्या महेश बोरुडे, शरयू भालचंद्र जगताप, रुफिन फिरोज तांबोळी, सौम्या रामभाऊ देशमुख, विभा प्रवीणकुमार गायकवाड, श्रीशा प्रदीप तांबोळी, आरुषा ऋषिकेश कारले या विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.


या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शितल रोहोकले व जयश्री खांदोडे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर विभाग प्रमुख सौ. उर्मिला साळुंके यांनी संपूर्ण नियोजनाची जबाबदारी सांभाळली.


या यशाबद्दल मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, लाईफ मेंबर शिवाजीराव लंके तसेच प्राचार्या छाया काकडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *