• Wed. Oct 15th, 2025

गुरुनानक देवजी जयंतीनिमित्त तारकपूरला रंगला किर्तन दरबार

ByMirror

Nov 15, 2024

सतनाम वाहे गुरु… सतनाम वाहे गुरु….चा गजर

शितल जगताप यांना बेबे नानकी महिला सक्षमीकरण पुरस्कार प्रदान

नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर मधील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांची 555 वी जयंती (प्रकाश पूरब) विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. बोले सो निहाल, सत श्री अकाल… चा जयघोष, अखंडपाठ व किर्तनच्या भक्तीमय वातावरणात जयंती सोहळा पार पडला. किर्तन दरबारच्या भक्तिरसात भाविक न्हाऊन निघाले. सतनाम वाहे गुरु… सतनाम वाहे गुरु….च्या गजराने वातावरण प्रफुल्लित झाले होते. यावेळी शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाई कुंदनलालजी गुरुद्वाराच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना गुरुनानक देवजी यांची बहिण बेबे नानकी यांच्या नावाने जनक आहुजा परिवाराच्या माध्यमातून गुरुनानक जयंतीनिमित्त पुरस्कार देण्यास प्रारंभ करण्यात आले आहे. सन्मान चिन्ह, रोख रक्कम, शाल व श्रीफळ या पुरस्काराचे स्वरुप आहे. या वर्षी पहिल्या पुरस्काराचे मानकरी शहरात महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या माजी नगरसेविका शितलताई संग्राम जगताप ठरल्या आहेत. त्यांना बेबे नानकी महिला सक्षमीकरण पुरस्कार सुनीता जनक आहुजा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जयंती कार्यक्रमासाठी आलेले मा.आ. अरुणकाका जगताप, शितल जगताप, सचिन जगताप व पूजा गोंडाल यांनी गुरुग्रंथ साहिबाचे दर्शन घेऊन समाजबांधवांना जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी जनक आहुजा, राजेंद्र कंत्रोड, बबलू आहुजा, ब्रिजमोहन कंत्रोड, हरजीतसिंग वधवा, ठाकूर नवलानी, दामोदर बठेजा, जितू गंभीर, जय रंगलानी, अनिश आहुजा, गुलशन कंत्रोड, जसपाल कुमार, राकेश गुप्ता, विक्की कंत्रोड, किशोर कंत्रोड, राजीव बिंद्रा, मुन्ना जग्गी, लखी खुबचंदानी, जसपाल कुमार, प्रितपालसिंग धुप्पड, किशन पंजवानी, इंजि. केतन क्षीरसागर, अजिंक्य बोरकर, अर्जुन मदान, अमोल गाडे, अजय पंजाबी, डॉ. सुरेंद्र खन्ना, करण आहुजा, अभिमन्यू नय्यर, सुशील बजाज, कैलाश नवलानी, गिरीश नवलानी आदी उपस्थित होते.


हुशियारपूर येथील भाई प्रितमसिंगजी मिठा तिवाना यांच्या जथ्थ्याने गुरुनानक देवजी यांच्या जीवनावर किर्तन सादर केले. रंगलेल्या किर्तनमध्ये दुख भंजन तेरा नाम…., वाहे गुरु! वाहे गुरु…. अशा एकापेक्षा एक सरस किर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनानंतर भाविकांना लंगरचे वाटप करण्यात आले. तर शुक्रवारी (दि.15 नोव्हेंबर) गुरुनानक देवजी जयंतीनिमित्त अखंड पाठ साहेबची समाप्ती झाली. जयंती उत्सवानिमित्त गुरुद्वाऱ्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *