• Tue. Mar 31st, 2026

राज्यस्तरीय मराठी प्राविण्य परीक्षेत जय बजरंग विद्यालयाचे यश

ByMirror

Mar 30, 2026

25 विद्यार्थी राज्य, जिल्हा व केंद्रीय गुणवत्ता यादीत झळकले


विद्यार्थ्यांनी उमटवला शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाईपलाईन रोड येथील आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालय येथील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा संवर्धन संचलित राज्यस्तरीय प्राविण्य परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील तब्बल 25 विद्यार्थी राज्य, जिल्हा तसेच केंद्रीय गुणवत्ता यादीत झळकले असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे.


राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी
इयत्ता पहिली : आडसरे श्रीनिधी गणेश (राज्यात द्वितीय), अनारसे कादंबरी योगेश (राज्यात तृतीय)
इयत्ता दुसरी : घुले ईशान दीपक (राज्यात द्वितीय)
इयत्ता सहावी : क्षीरसागर सिद्धेश अमोल (राज्यात द्वितीय)
जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी
इयत्ता पहिली : परळकर अनिरुद्ध अक्षय (जिल्ह्यात प्रथम), आहेर नियती वैभव (जिल्ह्यात द्वितीय)
इयत्ता दुसरी : आव्हाड अंजली रवींद्र (जिल्ह्यात द्वितीय), आव्हाड स्वरा रवींद्र (जिल्ह्यात चतुर्थ)
इयत्ता सातवी : कुशवाह अभिषेक प्रभाशंकर (जिल्ह्यात प्रथम), उबाळे पियुष बाळासाहेब (जिल्ह्यात चतुर्थ)
केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी
इयत्ता पहिली : गुंजाळ युग अनिल (केंद्रात चतुर्थ), विश्‍वकर्मा तानिया जितेंद्र (केंद्रात पंचम), बरबडे कृष्णप्रिया प्रवीण (केंद्रात पंचम)
इयत्ता दुसरी : वारे प्रथमेश अशोक (केंद्रात पंचम)
इयत्ता तिसरी : घुले दर्शन गणेश (केंद्रात द्वितीय)
इयत्ता चौथी : बरबडे प्रेरणा प्रवीण (केंद्रात तृतीय),
इयत्ता पाचवी : आडसरे श्रीलेखा गणेश (केंद्रात द्वितीय), कुलकर्णी आयुष अमृत (केंद्रात तृतीय), ठोकळ आरोही शंकर (केंद्रात चतुर्थ), मेहेत्रे कृष्णा कैलास (केंद्रात चतुर्थ), पवार शिवानी प्रवीण (केंद्रात पंचम)
इयत्ता सहावी : क्षीरसागर आदेश अमोल (केंद्रात प्रथम), भवार श्रद्धा तुकाराम (केंद्रात द्वितीय), भोसले श्रीराज गणेश (केंद्रात तृतीय), पवार साक्षी कृष्णा (केंद्रात चतुर्थ)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सहसचिव उमेशजी गांधी, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर, सहव्यवस्थापक अमोल तोडकर यांनी अभिनंदन केले.


विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षक व पालकांचे विशेष कौतुक केले. या यशामागे विद्यालयातील मराठी विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. श्रीमती सुरेखा दुधाडे, आशा घुले, कल्पना मिसाळ, छाया क्षीरसागर आणि राहुल मोरे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट तयारी करून मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *