• Sat. Apr 4th, 2026

प्रज्ञाशोध परीक्षेत जय बजरंग प्राथमिक विद्यालयाचे यश

ByMirror

Apr 2, 2026

जिल्हा गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकले

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. हेडगेवार प्रतिष्ठान आयोजित प्रज्ञाशोध परीक्षेत आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानाचे स्थान पटकावत उज्वल कामगिरी केली आहे.


या स्पर्धात्मक परीक्षेत इयत्ता चौथीतील चि. दर्शन गणेश घुले याने जिल्ह्यात 16 वा क्रमांक मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले. तसेच इयत्ता पाचवीतील कु. श्रीलेखा गणेश आडसरे हिने 17 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश मिळवले. इयत्ता सातवीतील चि. अभिषेक प्रभाशंकर कुशवाह याने जिल्ह्यात 13 वा क्रमांक मिळवला, तर चि. सिद्धेश अमोल क्षीरसागर याने 15 वा क्रमांक पटकावून विद्यालयाच्या यशात भर घातली.


या यशाबद्दल आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया, सहसचिव उमेश गांधी, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर आणि सहव्यवस्थापक अमोल तोडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरित केले. या यशामागे विद्यालयातील शिक्षकांचा मोठा वाटा असून, कल्पना मिसाळ, छाया क्षीरसागर, राहुल मोरे, अश्‍विनी बेरड आणि भागवत पाखरे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *