• Wed. Oct 15th, 2025

एन.डी.पी.एस. च्या गुन्ह्यातील विशेष खटला उच्च न्यायालयाकडून रद्द

ByMirror

Aug 6, 2025

गांजा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर निर्दोष असल्याचे सिध्द

नगर (प्रतिनिधी)- गंगापूर पोलिस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेल्या गांजाच्या प्रकरणात अडकलेले सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांना अखेर न्याय मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्या विरोधातील एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत दाखल विशेष गुन्हा रद्द ठरवला आहे.


दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताइतवाले यांनी गंगापूर पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 चे कलम 20 बी प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. यामध्ये त्यांनी फिर्याद दिली होती की, 28 फेब्रुवारी 2024 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत गांजाची अवैधरीत्या विना परवाना वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती. यासंदर्भात छापा मारण्याबाबतचे लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलीस स्टाफसह पंचांना घेऊन त्यांच्यावर रेड करायची असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गंगापूर यांना माहिती देऊन गंगापूर ते भेंडाळा जाणाऱ्या रोडवर एक इसम पांढऱ्या रंगाच्या सुझुकी एक्सेस मोपेडवर गोणी बांधलेल्या स्थितीमध्ये दिसल्याने त्याची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे 28 हजार 600 किलोग्राम गांजा मिळून आला होता. सदर व्यक्तीकडे गांजाबाबत अधिक चौकशी केली असता सदर गांजा अहिल्यानगर येथील संदीप भांबरकर यांच्याकडून विक्री करण्यासाठी आणल्याने त्यांच्यावर गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदरील गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करून वैजापूर सत्र न्यायालयांमध्ये विशेष घटना प्रलंबित होता. सदरील खटल्यास आरोपी संदीप अशोक भांबरकर यांनी रद्दबातल ठरविण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ॲड. एन.बी. नरवडे यांच्यामार्फत फौजदारी अर्ज दाखल केला होता.

सदरील प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती एस.ए. देशमुख यांच्या खंडपीठाने सदरील प्रकरणांमध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अवलोकन करून कन्फेशनल स्टेटमेंट ची वैधता विचारात घेऊन दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीच्या विरोधातील खटला रद्दबातल ठरवला. या प्रकरणामध्ये आरोपीच्या वतीने ॲड. एन.बी. नरवडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *