जय ज्योती… जय क्रांती! घोषणांनी परिसर निनादले
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या कामाचे लवकरच भूमिपूजन -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची शैक्षणिक चळवळ देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरली. त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शहरात उभारण्यात येत असलेला फुले दांम्पत्यांचा पूर्णकृती पुतळा शहराला भूषणावह ठरणार आहे. या कामाचे भव्य-दिव्य भूमिपूजन करण्याचे नियोजन सुरु आहे. सदर कामाचे भूमिपूजन थांबले असले, तरी पुतळ्याचे काम मात्र सुरू आहे. या कामाचे भूमीपूजन आणि त्याच वेळेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा संयुक्तिक लोकार्पण सोहळा लवकरच पार पडणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, सामजिक न्यायचे सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक किशोर डागवाले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, राष्ट्रवादी डॉक्टर विभागाचे अध्यक्ष डॉ. रणजित सत्रे, बाली बांगरे, फुले बिग्रेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, श्रीकांत आंबेकर, गणेश पांढरे, मळू गाडळकर, किरण मेहेत्रे, रोहित पडोळे, संकेत लोंढे, मयुर जाधव, शुभम आंबेकर, केमिस्टचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, अनिल निकम, राजेंद्र एकाडे, फुले बिग्रेड भिंगार शहराध्यक्ष संतोष हजारे, किरण जावळे, विनोद पुंड, रोहित इवळे, प्रमोद शेजुळ, आयुष चव्हाण, प्रकाश इवळे, नारायण इवळे, प्रकाश इवळे, बजरंग भुतारे, रेणुका पुंड, डॉ. योगिता सत्रे, खामकर सर आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, सावित्रीबाई फुले आपल्या कार्यकर्तृत्वाने स्त्री शक्तीच्या जनक ठरल्या आहेत. महिलांची पहिली शाळा काढून सर्व महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले. आज महिला थेट राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या असून, सर्वच क्षेत्रात महिलांना सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सन्मान मिळाला. त्यांच्या नावाने महात्मा फुले चौकात भव्य प्रवेशद्वार उभारण्याचे नियोजन सुरु आहे. सावित्रीबाई फुलेनगर प्रवेशद्वार नाव टाकून हा लोकार्पण सोहळा देखील लवकरच केला जाणार आहे. त्यांच्या नावाला शोभेल अशी कमान उभारण्याचे नियोजन सुरु आहे. या महान व्यक्तींचे विचारांची ज्योत पुढे घेऊन जाण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात अमित खामकर यांनी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा शहरात कुठेच नाही. यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णकृती एकत्रित पुतळा उभारण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच या पुतळ्याचे भूमिपूजन केले जाणार आहे. वर्क ऑर्डर निघालेली असून, पुतळा तयार करण्याचे काम देखील सुरू झालेले आहे. सर्व समाजाला या महापुरुषांच्या कार्याची व विचारांची प्रेरणा मिळण्यासाठी हे पुतळे स्फूर्ती देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.