• Wed. Feb 5th, 2025

भिंगारच्या श्री विशाल गणेश मंदिरात महिलांची मोफत नेत्र तपासणी

ByMirror

Feb 1, 2025

तर महिलांनी भरले नेत्रदान व अवयव दानाचे संकल्प अर्ज

गणेश जयंतीचा उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशन व सम्राट तरुण मंडळाच्या वतीने वतीने भिंगार येथील गणेश जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. गवळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिरात झालेल्या या शिबिरास महिला भाविकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. तसेच यावेळी मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाची जागृती करण्यात आली. नेत्रदान व अवयव दानाचा संकल्प केलेल्या महिलांनी अर्ज भरुन दिले.


जालिंदर बोरुडे म्हणाले की, समाजात मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान होत नसल्याने अनेक रुग्ण नेत्र व अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने सात व्यक्तींना जीवदान मिळते. शरीर हे नश्‍वर असून, मरणोत्तर अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलणार आहे. तर या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांनी धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गरजू महिलांवर मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याचे त्यांनी माहिती दिली. या शिबिरात सहभागी गरजूंना अल्पदरात चष्म्यांचे आणि मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशन व सम्राट तरुण मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *