• Wed. Dec 31st, 2025

स्व. गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

ByMirror

Dec 14, 2025

दत्ता गाडळकर यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम


शिक्षणाच्या संधीद्वारे उपेक्षित, दुर्बल घटक प्रवाहात येणार -दत्ता गाडळकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजपचे दत्ता गाडळकर यांच्या पुढाकाराने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी पवार, बाली बांगरे, विशाल खैरे, दत्ता खैरे, सुजय मोहिते, विजय गायकवाड, दीपक लोंढे, परेश लातूणकर, सुरेश लालबोग, निलेश गाडळकर, बंटी जाधव, हर्षल शिरसाठ, चारुदत्त जगताप, मनोज मिसाळ, सिदेश झावरे, सिदेश देवकर, सुजित लाळगे, शंतनू गाडळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दत्ता गाडळकर म्हणाले की, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर समाजातील उपेक्षित, दुर्बल आणि शेवटच्या घटकासाठी लढा दिला. त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे त्यांचे स्वप्न होते.

शिक्षण हेच व्यक्तिमत्त्व घडवणारे प्रभावी साधन असल्याने आजही त्यांचे विचार समाजाला दिशा देतात. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे म्हणजे मूंडे साहेबांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांना, अडचणींचा सामना करत शिक्षण पूर्ण करा, समाजात आपले स्थान निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले.


शालेय साहित्य मिळाल्याने छोट्या-छोट्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करीत संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *