• Mon. Nov 3rd, 2025

डॉ. शोएबमोहम्मद शेख जगातील उत्कृष्ट 2 टक्के वैज्ञानिकांच्या यादीत

ByMirror

Oct 13, 2023

देशाचे नाव उज्वल करुन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

स्टैनफोर्ड विश्‍वविद्यालयाच्या वतीने घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील युवा वैज्ञानिक डॉ. शोएबमोहम्मद फत्तेमोहंमद शेख यांनी जगातील उत्कृष्ट 2 टक्के वैज्ञानिकांच्या यादीत येण्याचा बहुमान पटकाविला आहे. ही यादी नुकतीच यूएसए मधील स्टैनफोर्ड विश्‍वविद्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. डॉ. शोएबमोहम्मद यांनी आपल्या कार्यातून देशाचे नाव उज्वल करुन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


आपल्या क्षेत्रातील सर्वोत्तम कार्याने दबदबा निर्माण केलेल्या जगातील 2 टक्के उत्कृष्ट वैज्ञानिकांचे कार्य पाहून त्यांचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ही यादी प्रकाशनासाठी एल्सेविअर प्रकाशकाचे सहकार्य लाभले आहे.


श्रीरामपूर मधील रहिवासी असलेले डॉ. शोएबमोहम्मद फत्तेमोहंमद शेख खूप कमी वयामध्ये जगातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांमध्ये स्थान मिळवून आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. त्यांनी कोरिया विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, सोल तसेच दक्षिण कोरिया मधून पीएचडी प्राप्त केली आहे. सध्या ते सौदी अरब येथील किंग सौद युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.


डॉ. शोएबमोहम्मद यांचे विज्ञान क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी जवळपास 160 उच्च दर्जाचे संशोधन पेपर, एक अमेरिकन पेटंट व काही पुस्तक सुद्धा प्रकाशित केलेले आहेत. त्यांना दक्षिण कोरिया कडून उत्कृष्ट संशोधन पेपरचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्यांनी श्रीरामपूर मध्ये शिक्षण घेऊन जागतिक स्तरावर वैज्ञानिक क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे. नेप्ती येथील प्रा. बाबुलाल अमीर सय्यद यांचे ते जावई आहेत . या यशाबद्दल नेप्तीचे माजी उपसरपंच फारुख सय्यद, प्रा. एकनाथ होले, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, ग्रामपंचायत सदस्य दादू चौगुले, प्रा. वाजिद सय्यद, प्रा. राजेंद्र झावरे आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ. शोएबमोहम्मद यांच्या यशा मागे वडिल फत्तेमोहंमद रुस्तुम शेख, डॉ. राजाराम माने यांचे मोलाचे योगदान आणि मार्गदर्शन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *