इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात
देशभरातून 1023 विद्यार्थ्यांचा सहभाग
झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 1023 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके व सचिव दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली.
शहरातील नगर-कल्याण महामार्गावरील सुखकर्ता लॉन येथे पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले. झटपट गणित सोडविण्याची परीक्षा यावेळी रंगली होती.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम अहिल्यानगर डाक विभागाचे प्रवर अधिक्षक विकास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. विकास पालवे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी अबॅकस आणि वैदिक गणित शिक्षण ही काळाजी गरज आहे. शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा गणित हा विषय सोपा करण्यासाठी त्यांना अबॅकस शिक्षण फायद्याचे ठरते. देशभरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमी विद्यार्थ्यांना देत असलेल्या अबॅकस व वैदिक गणिताच्या शिक्षणाबद्दल त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व आष्टी भाजपाचे युवा नेते जयदत्त धस यांची विशेष उपस्थिती लाभली. या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले निती थोरात, रुद्र सोले, अंजुश्री रासकर व हर्ष कोठे या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी मेघराज तांबे, समर्थ धोंडे, शिवराज चितळकर, राजवीर परदेशी, अनुष्का वायभासे, प्रणित देसाई, संस्कृती पाटील, शोर्या काटे, प्रिया शेळके, शोर्य वामन, आराध्य मते, वैष्णवी झांजे, शिवतेज जाधव, सलोनी देशमुख, प्रथमेश धोंडे, आर्य आरडे, स्नेहल परकाळे, पार्थ पवार, सहर्ष कोल्हापूर, आर्या गायकवाड, गितांजली खलाशे, शिवांश खंदारे, अनन्या घावटे, एस. हासीनी या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
अकॅडमीत उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या कोमल कर्डुळे यांना टू स्टार अवार्ड, मनीषा रकटाटे, शैला देसाई यांना स्टार टिचर अवार्ड तर चंदा हजारे व सोनिया आरडे या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळभाऊ रकटाटे, श्रीगोंदा माजी कृषी अधिकारी बलभिम शेळके, शहर सहकारी बँक चे व्हाईस चेअरमन प्रा. माणिकराव विधाते, महाराष्ट्र व गोवा चे कार्याध्यक्ष संतोष यादव, आष्टीचे मा. तहसिलदार शहादेव गिते, ॲड. कांतीलाल गव्हाणे, पत्रकार अनिल हिवाळे, बा.बा. दानवे शै. संकुल चे अध्यक्ष विजयकुमार दानवे, आष्टी तहसिल मंडळ अधिकारी गजेंद्र राठोड, मनपा प्राथ. शाळा ओंकारनगर चे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, युवा नेते दादासाहेब गव्हाणे, युनियन बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर शरद वाळके, व्ही प्राईम अकॅडमी च्या संचालिका विद्या यादव, महानगरपालिका शिक्षण संघ महाराष्ट्र राज्य चे राज्य सचिव अरुण पवार, स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर प्रविण रकटाटे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अमितजी पवार, मनपा अहिल्यानगर चे नगरसेवक प्रकाशजी भागानगरे, नगर भाजपा तालुकाध्यक्ष दादासाहेब दरेकर, वर्षाताई कबाडी, शैलेश पाटील, बापु शिंदे सर, नामदेव पाटील वाळके, संतोष लांडगे, सुरेश बनसोडे, नामदेव रकटाटे, रावसाहेब गावखरे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रविंद्र रकटाटे, सार्थक शेळके, श्रीतेज रकटाटे व सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अकॅडमीची व स्पर्धेची माहिती दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले.
