• Tue. Nov 4th, 2025

अश्‍लील फोटो व्हायरल करणाऱ्या त्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करुन बडतर्फ करण्याची मागणी

ByMirror

Oct 23, 2023

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार; विद्यार्थी, पालकांमध्ये भितीचे वातावरण

संस्थेचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदाराचा विश्‍वासू असल्याने प्राचार्यावर कारवाईस टाळाटाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या नेवासा तालुक्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्याने अश्‍लील फोटो फोटो व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आली असून, तो प्राचार्य संस्थेचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदाराचा विश्‍वासू असल्याने त्याच्यावर संस्थाचालक कार्यवाही करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


येत्या पंधरा दिवसात कारवाईने न झाल्यास संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थी व पालकांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भेंडे (ता. नेवासा) येथील संस्थेच्या महाविद्यालयातील प्राचार्याने महिलेसोबतचे अश्‍लील चाळ्यांचे फोटो विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर यांचा सहभाग असलेल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर व्हायरल केले.

जवळजवळ 28 फोटो टाकण्यात आले. सदर फोटो व्हायरल करणाऱ्या प्राचार्यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. हा कृत्याचा भांडाफोड ही चर्चा केवळ गंमत ठरत आहे. मात्र पालकांमध्ये तीव्र असंतोष व मुला-मुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने असुरक्षितता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे महाविद्यालयासह जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात जोरदार चर्चा असून, यामध्ये संस्थेची देखील बदनामी होत असल्याचे संघटनेच्या वतीने निवेदनात म्हंटले आहे.


सोशल मीडियावर अश्‍लील फोटो फोटो व्हायरल करणाऱ्या त्या प्राचार्यावर गुन्हे दाखल करुन बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *