• Wed. Dec 31st, 2025

रात्रशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळाले नवनीत अपेक्षित प्रश्‍नसंच

ByMirror

Dec 18, 2025

दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन


मासूम संस्थेचा भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मुंबईच्या मासूम संस्थेमार्फत नवनीत 21 अपेक्षितचे प्रश्‍नसंचाचे वाटप करण्यात आले. दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.


हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, रात्र शाळेचे चेअरमन ज्योतीताई कुलकर्णी, रात्र शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व रात्रशाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. पारस कोठारी यांनी रात्रशाळेचा वाढता गुणवत्ता आलेख सादर करुन यावर्षी देखील विद्यार्थी कष्ट व मेहनतीच्या जोरावर राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवणार असल्याची आशा व्यक्त केली. विद्यार्थी दिवसा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करुन रात्री शिक्षण घेताना त्यांना नवनीत 21 अपेक्षित उपयोगी येणार असल्याचे स्पष्ट केले.
अजित बोरा म्हणाले की, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणासाठी वेळ काढावा लागतो. यशाला कारणे नव्हे, तर अपार कष्ट लागतात. रात्रशाळेत विविध सोयी-सुविधा मिळताना त्याचा योग्य उपयोग करुन जीवनाचे ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.


ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या की, रात्र शाळेत देखील महिलांची वाढती संख्या कौतुकास्पद असून, अपूर्ण शिक्षण राहिलेल्या सावित्रीच्या लेकी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आपले कर्तृत्व सिध्द करत आहे. तर अनेक तरुण आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी शिक्षणाने पुढे जात आहे. शिक्षणाचे महत्त्व समजून अनेक होतकरु तरण-तरुणी या प्रवाहात येत आहे. दैनंदिन काम, कुटुंबाचा उदरनिर्वाह, शिक्षण व स्वत:च्या आरोग्याकडे देखील लक्ष देण्याचे त्यांनी आवाहन केले.


दरवर्षी रात्रशाळेत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, कमलाकर माने, वरिष्ठ व्यवस्थापक गुरुप्रसाद पाटील, एस.एस.सी. विभाग प्रमुख शशिकांत गवस, संदीप शेलार, निलेश ठोंबरे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष शिरीष मोडक, कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मानद सचिव संजय जोशी, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, माजी कार्याध्यक्ष अनंत फडणीस यांनी देखील उपक्रमाचे विशेष कौतुक केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. रात्रशाळेचे प्राचार्य सुनील सुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी शालेय शिक्षक गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे,उज्वला साठे, बाळू गोरडे, संदेश पिपाडा, मंगेश भुते, शरद पवार, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, अनुराधा दरेकर, वृषाली साताळकर, वैशाली दुराफे, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदींसह रात्रशाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *