केडगावात विकास कामांची हंडी फुटली
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील भूषण नगर लिंक रोड येथे संदीप कोतकर युवा मंच आणि श्री विश्वेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. माजी महापौर संदीप कोतकर यांच्या प्रेरणेतून पार पडलेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. हा सोहळा पाहण्यासाठी केडगाव ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

मुंबई येथील डी 88 गोविंदा पथकाने उत्साहात सलामी देत दहीहंडी फोडली… उत्साह पूर्ण वातावरणात गोविंदा गोविंदाच्या तालावर हजारो केडगाव मधील युवक थिरकले. सोनाली कुलकर्णी यांनी केडगाव ग्रामस्थांशी संवाद साधून केडगावच्या विकासासाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले.
दहीहंडी फोडणाऱ्या मुंबईच्या पथकाला 11 लाख 1 हजार 111 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर, संदीप कोतकर युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड, सागर सातपुते, विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, दत्ता जाधव, संजय गारुडकर, पोपट कराळे, बाप्पू राहिंज, बापू सातपुते, आदित्यनराजे कोतकर, गणेश सातपुते, गणेश नन्नवरे, बहिरू कोतकर, महेश सरोदे, सुनील उमाप, अशोक कराळे, प्रतीक कोतकर, सविता कराळे, मेघा सातपुते, रवी टकले, सुशांत दिवटे आदींसह केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूषण गुंड म्हणाले की, सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली. त्याचप्रमाणे केडगावात सर्व सहकाऱ्यांनी माजी महापौर संदीप कोतकर यांच्या खांद्याला खांदा लावून विकासाची हंडी फोडली असल्याचे सांगितले. सागर सातपुते यांनी ही केवळ दहीहंडी नसून, केडगावमधील रखडलेल्या विकास कामांची हंडी होती. पुन्हा केडगावात विकासपर्व सुरु होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्यामुळे त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.