• Fri. Sep 19th, 2025

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

ByMirror

Nov 10, 2024

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार सन्मान

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती दिनी राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त होणार पुरस्कार वितरण

नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. 12 जानेवारी रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, साहित्य, वैद्यकिय व पर्यावरण संवर्धनावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून, पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी केले आहे.


दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तर राष्ट्रीय युवा सप्ताह विविध उपक्रमांनी निमगाव वाघा (ता. जि. नगर) येथे उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार, समाज गौरव, क्रीडा रत्न व युवा गौरव, राष्ट्रमाता जिजाऊ नारी शक्ती पुरस्कार तसेच साहित्य क्षेत्रात काव्य प्रतिभा पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. या पुरस्कारांसाठी प्रस्ताव 10 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवायचे आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी संस्थेचे कार्यालय स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा ता. जि. अहिल्यानगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346; 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *