• Thu. Oct 16th, 2025

भोयरे पठारला मतदार नोंदणी अभियान

ByMirror

Aug 29, 2023

युवक-युवतींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदान प्रक्रियेत नवीन मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी व निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान होण्याच्या उद्देशाने भोयरे पठार (ता. नगर) येथे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानास युवक-युवतींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले.


अविनाश साठे (सर) युवा मंच व मित्रपरिवाराच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या प्रौढ व्यक्तींची मतदान नोंदणी झालेली नाही व ज्या लोकांना मतदार यादी मध्ये दुरुस्ती करायची होती अशा व्यक्तींची फॉर्म भरुन घेण्यात आले. तर मतदान यादीतून नाव कमी करणे, एकाच मतदार संघात नाव स्थलांतरीत करणे, नाव, वय व पत्ता दुरुस्तीसाठीचे अर्ज स्विकारण्यात आले.


भोयरे पठार मधील भैरवनाथ मंदिरासमोरील सभा मंडपात दिवसभर ही प्रक्रिया सुरु होती. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व सदस्य माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *