बहिणाबाई चौधरी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्काराने होणार सन्मान
नगर (प्रतिनिधी)- धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अहिल्यानगर मधील कवयित्री सरोज आल्हाट यांच्या सखे या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय बहिणाबाई चौधरी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिलांच्या भावविश्वाचे अंतरंग उलगडणारा हा काव्यसंग्रह असून, त्याची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती माहिती संमेलनाचे संयोजक व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.

हा पुरस्कार 5 सप्टेंबर, शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आल्हाट यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. कवयित्री सरोज आल्हाट गेल्या 30 वर्षापासून साहित्य, समाजसेवा आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे मराठी आणि इंग्रजीतही काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.