• Thu. Mar 26th, 2026

अशोकभाऊ फिरोदियाच्या विद्यार्थ्यांचे शासकीय चित्रकला स्पर्धेत यश

ByMirror

Mar 26, 2026

इलिमेंटरी व इंटरमिजिएट मध्ये 29 विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण


आर्या जाधव हिने राज्याच्या गुणवत्ता यादीत पटकाविले 23 वे स्थान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या इलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. जाधव आर्या सुरज हिने हिने राज्याच्या गुणवत्ता यादीत 23 वे स्थान मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल तिला प्रमाणपत्रासह 2500 रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.


यंदा शाळेचा इलिमेंटरी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून 17 विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तसेच इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 92 टक्के लागला असून 12 विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या या सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेसह कला क्षेत्रातही आपली छाप सोडली आहे.


आर्या जाधव हिच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक सुनील जोर्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीने मेहनत घेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, प्राचार्य प्रभाकर भाबड तसेच सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *