राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली निवड
नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नईम शेख यांची अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नुकतेच शहरात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत नईम शेख यांच्या नियुक्तीची घोषणा शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केली.
या बैठकीप्रसंगी शहराध्यक्ष दानिश शेख, संदीप वाकचौरे, निजाम शेख, सोफियान काझी, अरबाज शेख, अजीम खान, हुसेन शेख, जमीर शेख, संतोष पाडळे आदी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र गवई यांनी जिल्ह्यात उत्तम प्रकारे युवकांच्या माध्यमातून रिपाईचे संघटन झाले आहे. पक्षात काम करताना युवक समाजकारणाच्या भावनेने योगदान देत असल्याचे त्यांनी कौतुक केले. नईम शेख रिपाईमध्ये मागील सात ते आठ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अल्पसंख्याक शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती.
त्यांचे पक्षातील कार्य व उत्तम संघटन कौशल्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे सुशांत म्हस्के यांनी सांगितले. या नियुक्तीबद्दल शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.