• Wed. Oct 15th, 2025

चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

ByMirror

Jul 4, 2024

फिर्यादी यास रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट

अहमदनगर (प्रतिनिधी)- उसनवार घेतलेल्या साडे आठ लाख रुपयेच्या परतफेडीसाठी देण्यात आलेल्या धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी मिरणाल बॅनर्जी यांच्यावर नोव्हेंबर 2022 न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुनावणी होऊन फिर्यादी यास रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करुन बॅनर्जी यांना चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.


आर्थिक अडचणीसाठी उसनवार घेतलेले साडे आठ लाख रुपयेच्या परतफेडीसाठी आरोपी मिरणाल बॅनर्जी यांनी फिर्यादी यांना साडे आठ लाख रुपयाचा चेक दिला होता. सदरचा चेक फिर्यादी यांनी त्यांच्या बँक खात्यात भरला असता तो वटला नाही. चेक बाऊन्स होऊन 4 नोव्हेंबर 2022 रोजी परत आला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला 14 नोव्हेंबर 2022 रोजी नोटीस पाठवून चेक बाऊन्स झाल्याबाबत कळविले. आरोपीने सदरची नोटीस स्विकारुन त्या नोटीसला उत्तर दिले.


याप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपी बॅनर्जी विरुद्ध अतिरिक मुख्य न्यायदंडाधिकारी मा.ई.मो. नाईकवाडी (कोर्ट नं.7) यांच्या न्यायालयात नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम 138 प्रमाणे फौजदारी खटला दाखल केला होता. सदर प्रकरणाची गुणदोषावर चौकशी करून न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी हा फिर्यादी यास रक्कम देणे लागत नाही, म्हणून आरोपी बॅनर्जी यांना निर्दोष मुक्ततेचे 1 जुलै 2024 रोजी आदेश दिले. आरोपीच्या वतीने ॲड. हाजी रफिक बेग, ॲड. रियाज बेग व ॲड. आयाज बेग यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *