अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील योगिता पंकज औताडे यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. पोहेगाव (ता. कोपरगाव) औताडे यांनी सुमनदीप विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) पिपारिया वडोदरा, गुजरात येथील विद्यापीठामध्ये नर्सिंग या क्षेत्रात सामाजिक आरोग्य परिचारिका या विषयांत पीएचडी पूर्ण केली. त्यांना नुकतेच विद्यापीकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील निवडक तालुक्यांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या प्रसाराचे मूल्यांकन करणे व पुनर्वसन हस्तक्षेपामुळे स्तनाच्या कर्करोगांपासून मुक्त झालेल्या महिलांच्या जीवन गुणवत्तेवर काय परिणाम होतो? या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला. तसेच त्यांचे दोन रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
त्यांना सुमनदीप नर्सिंग कॉलेजचे प्रा.डॉ. अनिता प्रकासम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डिपार्टमेंट ऑफ सोशल मेडिसिनचे प्रा.डॉ. ग्रीष्मा चौहान, मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे बी.के. शहा व प्रा.डॉ.रविंद्र एच.एन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल सुमनदीप अभिमत विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. राजेश पी. भराने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यासाठी औताडे यांना सर्व सहयोगी आणि परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले.