रयत शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे 9 विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयात या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अभिषेक कळमकर, उत्तर विभागीय निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, अर्जुनराव पोकळे, शिवाजीराव भोर, अंबादास गारूडकर, विश्वासराव काळे, शामराव व्यवहारे, विष्णुपंत म्हस्के, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एल. ठुबे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदी उपस्थित होते.
प्रज्ञाशोध परीक्षेच्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सिद्धेश विनायक गोरे याने तृतीय क्रमांक येण्याचा बहुमान पटकाविला. तर ऋग्वेद योगेश झरेकर पाचव्या व वेदांत बापूसाहेब चेमटे नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच वेदांत बापूसाहेब चेमटे, सोहम शरद रायकर, यश विकास झरेकर, आरुष रविंद्र चंदन, तनया प्रवीण पळसकर, श्रेया दिगंबर वाळके, सोहम दिगंबर अहिरे हे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहे. या विद्यार्थ्यांना मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शीतल रोहोकले, जयश्री खांदोडे, सोनाली वेताळ, शिल्पा कानडे, सोनाली अनभुले, इंदुमती दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.