सकल मातंग समाजाचा पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक अप्पू हत्ती चौकात उभारलेल्या अश्वावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर सकल मातंग समाज केडगावच्या वतीने शिवाजी मंगल कार्यालय अंबिकानगर येथे मातंग समाजाच्या बैठकिचे रविवार दि. 28 जून रोजी सायंकाळी 5.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
केडगाव सकल मातंग समाजाचे समन्वयक प्रा. विशाल पाचारणे यांनी मातंग समाजबांधवांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सदर मेळाव्यास प्रभाग क्र. 15,16,17 च्या नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे अध्यक्ष संतोष साळवे यांनी सांगितले. ॲड. प्रदीप सकट, राजू बोरगे, महेश लोखंडे, विष्णू लोखंडे, साठे साहेब, संतोष उमाप, राजू डाडर, अक्षय बोरगे, गोरख लोखंडे आदी पदाधिकारी या बैठकीचे नियोजन व व्यवस्थापन पाहत आहे. समाजातील लोकांनी अधिक माहितीसाठी 8208954925 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे प्रसिद्धी प्रमुख धनंजय पाचारणे यांनी म्हंटले आहे.
