• Wed. Jan 28th, 2026

जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत सिराज शेख चे सुवर्णयश

ByMirror

Jan 28, 2026

55 किलो वजनगटात प्रथम क्रमांकाची कमाई


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, आय.बी.बी.एफ. संलग्न अहिल्यानगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक स्पोर्ट्‌सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव व मेन्स फिजिक्स स्पर्धेत सिराज शेख याने उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत 55 किलो वजनगटाच्या शरीर सौष्ठव प्रकारात सिराज शेख याने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. उत्तम शरीरयष्टी, काटेकोर व्यायाम, योग्य आहार व शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर त्याने बॉडी बिल्डिंगचे दर्शन घडवीत परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली.


सिराज शेख हा हिमालया वेलनेस या संस्थेमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून, व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत त्याने फिटनेस व शरीर सौष्ठव क्षेत्रात हे यश मिळवले आहे. त्यामुळे तो युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. सिराज शेखच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *