राज्यातील 23 शाळांतील 207 कर्णबधिर विद्यार्थ्यांचा सहभाग; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देणारा उपक्रम
प्रत्येक दिव्यांग शाळेत संगणक प्रयोगशाळा असणे ही काळाची गरज -देविदास कोकाटे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर अपंग कल्याणकारी मंडळ, अहिल्यानगर व जानकीबाई आपटे मूक बधीर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. कलाताई जोशी स्मृती करंडक स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक क्षमतेला वाव देणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील 23 शाळांमधील 207 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपले कौशल्य सिद्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. मकरंद खेर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर देविदास कोकाटे उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी कोकाटे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून अशा स्पर्धांमुळे बदलत्या युगात दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असल्याचे सांगितले. नव्या युगात दिव्यांग विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर होणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक दिव्यांग शाळेत संगणक प्रयोगशाळा असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. मकरंद खेर म्हणाले की, निसर्गाने भरभरून दिलेले असतानाही आपण अनेकदा तक्रार करतो, मात्र येथे असलेले सर्व विद्यार्थी दिव्यांग असूनही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व शांतता दिसते. लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात, जसे घडवू तसे घडतात. स्पर्धक विद्यार्थ्यांसोबतच त्यांना घडविणाऱ्या दिव्यांग शाळांतील शिक्षकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. दिव्यांग विद्यार्थी हेच खऱ्या अर्थाने शिक्षकांचे प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या अध्यक्षांनी कर्णबधिर दिव्यांगांना समाजात वावरताना व संवाद साधताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यावर्षी ओष्ठवाचन ही नाविन्यपूर्ण स्पर्धा सुरू केल्याची माहिती दिली. समोरील व्यक्ती बोलताना होणाऱ्या ओठांच्या हालचालींचे निरीक्षण करून शब्द व वाक्य समजून घेऊन त्याचे लिखाण करणे, या स्वरूपाची ही स्पर्धा होती. या उपक्रमाला शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे सचिव डॉ. ओजस जोशी यांनी सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना संबोधित करताना सांगितले की, तुमचा सहभाग आमचा उत्साह वाढवतो. शालेय स्पर्धांमधील यश हे शिक्षकांच्या मेहनतीवर अवलंबून असते. विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सहभागी विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने तयारी करून पुढील वर्षी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे यांनी स्पर्धेच्या 24 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत पुढील वर्षी होणाऱ्या 25व्या रौप्य महोत्सवी स्पर्धेत सर्व शाळांनी सहभागी व्हावे, असे निमंत्रण दिले. सलग 25 वर्षे चालणारी महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर आधारित ही एकमेव स्पर्धा असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक शिवानंद भांगरे व विशेष शिक्षक सुदाम चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन विशेष शिक्षक संजय राठोड व ज्योती जाधव यांनी मानले. विद्यालयातील विशेष शिक्षिका अर्चना देशमुख यांनी साईन लँग्वेजद्वारे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय वाचा कौशल्य, चित्रवाचन व ओष्ठवाचन स्पर्धांमध्ये विविध वयोगटांत पुढीलप्रमाणे विजेते ठरले
वाचा कौशल्य स्पर्धा
वयोगट 9 ते 12
कु. वाटाणे अन्वी (स्वर सेंटर, सुपा, ता. पारनेर), कु. थोरात धनीश्री (आधार मूक बधिर विद्यालय, पुणे), कु. चव्हाण निशा (आयोध्या ट्रस्ट, पुणे), कु. बढे संस्कृती (निवासी मूक बधिर विद्यालय, उमरगा), कु. चौधरी प्रिया (स्वर सेंटर, सुपा, ता. पारनेर)
वयोगट 12 ते 15
कु. शिंदे अनन्या (आधार मूक बधिर विद्यालय, पुणे), दळवी वेदांत (इंडियन रेडक्रॉस, पुणे), इटकर तन्मय (आयोध्या ट्रस्ट, पुणे), कु. बन्ने आराध्या (रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी), कु. गवळी पूनम (कस्तुरबा गांधी मूक बधिर विद्यालय, बार्शी, जि. सोलापूर)
वयोगट 15 ते 18
काळे यश (हडपसर कर्ण बधिर विद्यालय, पुणे), कु. उबाळे श्रेया (चिंचवड मूक बधिर विद्यालय, पुणे), कोल्हे प्रणव (रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी), भोईर ऋषभ (आधार मूक बधिर विद्यालय, पुणे), कु. पठाण झिनत सिकंदर (नवज्योत निवासी विद्यालय, पाथर्डी, जि. अहिल्यानगर)
चित्रवाचन स्पर्धा
वयोगट 9 ते 12
कु. मयुरी दिनेश मोरे (निवासी मूक बधिर विद्यालय, उमरगा), कु. स्वानंदी बडदे (हडपसर कर्ण बधिर विद्यालय, पुणे), कु. स्वरा आनंदा पथवे (श्री साई श्रद्धा मूकबधिर विद्यालय, शिर्डी), गौरख चंद्रकांत पाटील (रघुनाथ केले श्रवण विकास विद्यालय, धुळे), कु. जान्हवी रणजीत सातपुते (रोटरी मूक बधिर विद्यालय, इचलकरंजी)
वयोगट 12 ते 15
कु. आर्या लक्ष्मण मिसाळ (सोजर मूक बधिर विद्यालय, भूम), मयुर नवनाथ भोंडवे (जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय, अहिल्यानगर), वेदांत वाघमोडे (आधार मूक बधिर विद्यालय, पुणे), योगेश बाळासाहेब जाधव (कस्तुरबा गांधी मूक बधिर विद्यालय, बार्शी), सोहम वाघमारे (शाहू महाराज मूक बधिर विद्यालय, आष्टी, जि. बीड)
वयोगट 15 ते 18
कु. शिंदे निकिता शेखर (जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय, अहिल्यानगर), तुषार देविदास पाटील (रघुनाथ केले श्रवण विकास विद्यालय, धुळे), वैष्णवी बाबासाहेब दहिफळे (संजीवनी मूक बधिर विद्यालय, सावेडी, अहिल्यानगर), कु. सृष्टी स्वामी (हडपसर कर्ण बधिर विद्यालय, पुणे), जैतुनबी शौकन कादरसे (सोजर मूक बधिर विद्यालय, भूम)
ओष्ठवाचन स्पर्धा
वयोगट 9 ते 12
आदित्य सानप (जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय, अहिल्यानगर), माही संदीप जाधव (रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी), शिवनील धनगर (आधार मूक बधिर विद्यालय, पुणे), रिद्धिम कुशवाह (इंडियन रेडक्रॉस, एम. जी. रोड, पुणे), कु. पौर्णिमा रामेश्वर वाघमारे (सोजर मूक बधिर विद्यालय, भूम, जि. उस्मानाबाद)
वयोगट 12 ते 15
सोहम वाघमारे (शाहू महाराज मूक बधिर विद्यालय, आष्टी), कु. आरती अर्जुन ननावरे (चिंचवड मूक बधिर विद्यालय, पुणे), कु. सायली यादव (आधार मूक बधिर विद्यालय, पुणे), कु. सिद्धी थोरात (इंडियन रेडक्रॉस, पुणे), कु. प्रेया संदीप पाटील (रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी)
वयोगट 15 ते 18
कु. कावेरी खेंगरे (हडपसर कर्ण बधिर विद्यालय, पुणे), कु. आदिती पालवे (जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय, अहिल्यानगर), प्रणव सुनील कोल्हे (रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी), प्रेयस शरद निघुते (संग्राम मूक बधिर विद्यालय, जि. अहिल्यानगर), कु. सृष्टी पानगे (आधार मूक बधिर विद्यालय, पुणे)
विजेत्यांना प्रथम (₹2001), द्वितीय (₹1501), तृतीय (₹1001) व उत्तेजनार्थ (₹501) अशी रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व स्मृतीचिन्हे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
