श्री समर्थ कथेच्या बोधचिन्हाचे अनावरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोधचिन्हामुळे श्री समर्थ कथेला आगळीवेगळी उंची प्राप्त झालेली आहे. धार्मिकतेचे प्रतीक असलेला लाल, नारंगी, पिवळा रंग व केशरी ध्वज लोगोमधून उपक्रमाची व्यापकता सांगतो. अयोध्येच्या धर्तीवरील श्रीराम मंदिर, सूर्याच्या पार्श्वभूमीमधील श्री समर्थांचा प्रसन्न चेहरा, देवनागरी अक्षरशैलीतील श्री समर्थ कथा हे शीर्षक, सज्जनगडावरील किल्ले सदृश्य आकार, सेवेची तेजस्वी परंपरा सांगणारा दिवा असे चित्रवर्णन असलेल्या या बोधचिन्हातून या उपक्रमाची अचूक मांडणी चि. ऋग्वेद कुलकर्णी यांनी केली असल्याची माहिती सुरेश क्षीरसागर यांनी दिली.
श्री समर्थ कथा सोहळ्याच्या बोधचिन्ह अनावरण प्रसंगी श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सचिव क्षीरसागर बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक ओहोळ, श्री समर्थ कथा सोहळा समिती प्रमुख संजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून या उपक्रमाचे सोशल मीडिया हेड चि. ऋग्वेद संजय कुलकर्णी यांनी हा लोगो बनवलेला आहे.
सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणामध्ये 2 जाने-सायं 5 वाजता, 3 व 4 जाने.- सायं 4 वाजता राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित “एक तरी कथा अनुभवावी” या पहिल्या श्री समर्थ कथेचे आयोजन श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंटस् यांच्या वतीने करण्यात आले आहे.व्कथाकार श्रीअजेयबुवा रामदासी महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन व रसाळ वाणीच्या माध्यमातून साधकांना समर्थ विचारांची आगळीवेगळी पर्वणी मिळणार आहे.
ग्राफिक, फॉन्ट, रंग, विशिष्ट अक्षरशैली, विविध चिन्हे आदींचा चपखल वापर करून बनवलेला हा लोगो श्री समर्थ कथेच्या विविध फ्लेक्स, पोस्टर, आमंत्रण पत्रिका, श्री समर्थ दर्शन- प्रदर्शन आदी प्रचार प्रसार साहित्य तथा व्हिडिओ, ग्राफिक इमेजेस, लाईव्ह शूटिंग यामध्ये देखील हा लोगो वापरला जाणार असल्याची माहिती ऋग्वेद कुलकर्णी यांनी दिली.
