• Wed. Dec 31st, 2025

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुनोबाचीवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ग्रामस्थांना ब्लँकेट वाटप

ByMirror

Dec 8, 2025

ग्रामस्थांची आरोग्य तपासणी; उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम


बाबासाहेबांच्या विचार व प्रेरणेने उमेद फाऊंडेशन समाजातील शेवटच्या घटकांसाठी कार्य -कुणाल तनपुरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुनोबाचीवाडी (ता. राहुरी) येथे जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत आणि उमेद सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गरजू घटकातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व 65 कुटुंबातील व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तर ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. याप्रसंगी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद साळवे, काकासाहेब म्हस्के चे डॉ. आझाद शेख, उज्वला गवळी, उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, सचिव सचिन साळवी, सदस्य विजय लोंढे, रवी साखरे, जि.प. शाळा मुख्याध्यापिका सौ. वैशाली खरमाळे, उपशिक्षक दत्तात्रय डोईफोडे, प्रवीण महाडुळे, शौकत शेख, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष मंगेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य धोंडिभाऊ बाचकर, पोलीस पाटील हरिभाऊ जाधव, माजी उपसरपंच मिनीनाथ जाधव, अंगणवाडी सेविका लीलाबाई जाधव, हिरामण जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थी उपस्थित होते.


थंडीच्या दिवसांत गरजू कुटुंबांना मदत करण्याच्या हेतूने उमेद फाऊंडेशनतर्फे 65 कुटुंबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. तसेच उमेद फाऊंडेशनच्या जिल्हा महिला संघटक सचिवपदी उज्वला गवळी व जिल्हा सोशल मीडिया प्रमुख विजय लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


अनिल साळवे म्हणाले की, उमेद फाऊंडेशन समाजातील प्रत्येक स्तरावर सेवा कार्य करत आहे. समाजातील उपेक्षित घटकांना आधार देऊन गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील दिली जात आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य देत आम्ही ग्रामीण भागातील विकास उपक्रमांना अधिक गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कुणाल तनपुरे म्हणाले की, उमेद फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक समस्यांवर उपाययोजना यांसारखे उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गरजांनुसार नवे कार्यक्रम राबवण्याचे नियोजन सातत्याने सुरु असून, बाबासाहेबांच्या विचार व प्रेरणेने फाऊंडेशन समाजातील शेवटच्या घटकांसाठी कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उज्वला गवळी म्हणाल्या की, उमेद फाऊंडेशन ग्रामीण भागासाठी सातत्याने काम करत आहे. त्या कार्यात सहभागी होऊन योगदान देणे अभिमानास्पद आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला.


या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरांगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, प्रवीण कोंढावळे, प्रियांका खिंडारे, तसेच मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष, रमेश घाडगे, जय युवा असोसिएशनचे ॲड. महेश शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश जाधव यांनी केले. आभार दत्तात्रय डोईफोडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *