जयभीमच्या घोषणा देऊन न्याय, समता आणि बंधुता यांचे मूल्य जपण्याचा संकल्प
बाबासाहेबांनी दिलेल्या न्याय-समानतेच्या विचारांनीच देश उभा आहे -अमित काळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी युवक कार्यकर्त्यांनी “जयभीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. सर्वांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यांचे मूल्य जपण्याचा संकल्प केला. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, प्रा. विलास साठे, प्रा. भिमराव पगारे, प्रा. डी. आर. जाधव, रमेश भिंगारदिवे, पत्रकार महेश भोसले, पत्रकार उमेश साठे, डॉ. वसंत खरात, रिपाई युवक तालुकाध्यक्ष आकाश बडेकर, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, कृष्णा भिंगारदिवे, प्रशांत पवार, अमर बडेकर, उबेद दातरंगे, जालिंदर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, भारताच्या सामाजिक परिवर्तनाची खरी क्रांती बाबासाहेबांनी घडवून आणली. दीन-दलित, शोषित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. समानतेचा हक्क, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि लोकशाहीतील मानवी मूल्ये आज प्रत्येक भारतीयाला जर लाभत असतील, तर त्याचे एकमेव श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. बाबासाहेबांनी दिलेल्या न्याय-समानतेच्या विचारांनीच देश उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काळे पुढे म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ही बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असून वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी तळागाळात कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानेच समाजात खऱ्या अर्थाने समता व बंधुता प्रस्थापित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
