मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठान व थोरात सुपर स्पेशलिटी आय केअरचा संयुक्त उपक्रम
नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठान व थोरात सुपर स्पेशलिटी आय केअरच्या वतीने 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 10 ऑगस्ट रोजी माणिक चौक येथील चाँद सुलताना हायस्कूल मध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर होणार असून, या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आबिद हुसेन यांनी केले आहे.
या शिबिरात नेत्र तज्ञ डॉ. रोहित थोरात, डॉ. प्रीती थोरात या रुग्णांची तपासणी करणार असून, यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नेत्र तपासणी करुन उपचार केले जाणार आहेत. डोळ्यांची नंबर तपासणी, अल्प दरात मोतीबिंदू, काचबिंदू, तिरलेपणा आदी नेत्र विकारावर अल्पदरात विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तरी शहरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिबिराच्या अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी आबिद हुसेन 9921515755, शरीफ सय्यद 8421022684 व मनीषा श्रीगादी 8421436721 यांच्याशी सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.