फौजदारी केसेस मधूनही निर्दोष मुक्तता
नगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड व्यावसायिक सचिन जामगावकर यांनी संतोष नामदेव भोंग (रा. निमगाव केतकी ता. इंदापूर, पुणे) यांच्याविरुद्ध रक्कम 8 लाख 38 हजार रुपये वसूल होवून मिळण्यासाठी दिवाणी न्यायालय व स्तर येथे दावा दाखल केला होता. वादी-प्रतिवादी यांना उसनवार दिलेली रक्कम सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे वादी यांचा दावा सहदिवाणी न्यायाधीश बी.व्ही. दिवाकर यांनी फेटाळला. सदर दाव्यात प्रतिवादी यांच्या वतीने ॲड. गजेंद्र पिसाळ यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. विशाल पांडुळे व ॲड. निखिल चव्हाण यांनी सहकार्य केले.
यापूर्वी वादी सचिन जामगावकर यांनी प्रतिवादी संतोष नामदेव भोंग व त्यांची पत्नी सीमा भोंग यांच्याविरुद्ध परक्राम्य संलेख कायदा कलम 138 अन्वये फौजदारी केस दाखल केलेल्या होत्या. त्यामध्ये फिर्यादी यांनी विसंगत साक्षी पुरावा दिल्याने संतोष भोंग व त्यांच्या पत्नी विरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी केसेस मधून त्यांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. सदर केस मध्ये आरोपीच्या वतीने ॲड. मुरलीधर पवार व ॲड. गजेंद्र पिसाळ यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. विशाल पांडुळे, ॲड. अच्युत भिसे व ॲड. निखिल चव्हाण यांनी सहकार्य केले.